योजना: State
दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा उद्योग सुरु करुन, स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक पुनर्वसन साधता यावे म्हणून १,५०,०००/- पर्यंतच्या प्रकल्पास अनुदान देण्याची योजना आहे. सदरील योजनेद्वारे प्रत्यक्षात ८०% रक्कम बँक कर्ज आणि २०% रक्कम समाज कल्याण विभागा-कडून बीज भांडवल म्हणून अनुदान देण्यात येते.
विहित नमुन्यातील अर्जासोबत अपंगत्वाचे प्रमाणपत्र,रहिवासी दाखला,, उत्पन्न दाखला,वयाचा दाखला,कोटेशन,जागेचा उतारा/जागा मालकाचे संमतीपत्र,दोन फोटो (प्रस्ताव दोन प्रतीत सादर करावा.)